कळंबोली मंडलाची कार्यकारिणी जाहीर 
कळंबोली मंडलाची कार्यकारिणी जाहीर 

 

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली मंडलाचे अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी कळंबोली मंडलाची कार्यकारिणी जाहीर केली आहे.   

           त्यानुसार कळंबोली मंडलाच्या सरचिटणीसपदी राजेंद बनकर, प्रशांत रणवरे, उपाध्यक्षपदी दिलीप बिष्ट, मोनिका महानवर, कुमार झा, संदीप भगत, सुधीर अहिरे, सचिवपदी संतोष गायकवाड, दत्ता बिनवडे, बजरंगबली सिंग, शेर बहादूर सिंहम प्रमिला पाटील, बायजा बारगजे, कोषाध्यक्षपदी महादेव कोळी यांची तसेच कळंबोली महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी मनिषा निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग ७ च्या अध्यक्षपदी संजय दोडके, प्रभाग ८ अध्यक्षपदी प्रकाश शेलार, प्रभाग १० अध्यक्षपदी रामदास महानवर, तसेच उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी केशवलाल यादव, वकील सेलच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील, व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी कमल कोठारी, वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी डॉ. सागर पाटील, दक्षिण भारतीय आघाडी सेलच्या अध्यक्षपदी निषित उछबली, भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी आबासाहेब घुटुकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Comments