रायगड व पनवेल असोसिएशन किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पनवेलचे खेळाडू मुंबई विभागात प्रथम ...

 

पनवेल / वार्ताहर :-  रविवार दि. १४फेब्रुवारी २०२१ रोजी रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने समाज मंदिर हॉल, नवीन पनवेल येथे मुंबई विभागीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, वसई, पालघर, मुंबई उपनगर इ. ठिकाणाहून ३५० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या खांदा कॉलनी शाखेने १३ सुवर्णपदक आणि १२ रौप्यपदक जिंकून मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकवण्याचा मान मिळवला. सदर विद्यार्थी हे आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे शिहान चिंतामणी मोकल (५ डिग्री ब्लॅक बेल्ट) आणि सेन्सेई प्रतिक कारंडे (३ डिग्री ब्लॅक बेल्ट) यांच्याकडे किकबॉक्सिंगचे धडे घेत आहेत.

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे:-
सुवर्णपदक विजेते :-
1. काव्या मोकल (पॉईंट फाईट)
2. कृतार्थ खोपकर (पॉईंट फाईट)
3. ओम पिसाळ (पॉईंट फाईट)
4. सम्राट कांबळे (पॉईंट फाईट)
5. पंक्ती पाठक (पॉईंट फाईट)
6. निधी पाठक (पॉईंट फाईट)
7. यशश्री पाठक (पॉईंट फाईट)
8. हर्षदा मोकल (पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट)
9. आर्यन बंगेरा (पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट)
10. राजेंद्र कान्हेरे (पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट)

रौप्यपदक विजेते :-
1. अरफान शेख (पॉईंट फाईट)
2. स्पर्श जाधव (पॉईंट फाईट)
3. आदित्य कापडोस्कर (पॉईंट फाईट)
4. अथर्व मसूरकर (पॉईंट फाईट)
5. लिपिका नखले (पॉईंट फाईट)
6. ऊर्जा गोळे (पॉईंट फाईट)
7. स्मित पाटील (पॉईंट फाईट)
8. अथर्व भोसले (पॉईंट फाईट)
9. विघ्नेश पाठक (पॉईंट फाईट)
10. श्रवण नगरे (पॉईंट फाईट)
11. संयोगीता मोकल (पॉईंट फाईट)
विजेत्या स्पर्धकांचे वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments