पनवेल दि.२८ (वार्ताहर): तालुक्यातील गाढी नदीत बुडून दोघा तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील भानघर गावाजवळील गाढी नदीत सौम्य दास (वय-२५) व श्रेयस शेनवी (वय-१७) असे दोघे तरूण दि. २७ फेब्रुवारी रोजी आदई गावातून त्याठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. परंतु ते अद्याप घरी न परतल्याने ते हरविल्याची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे.