पनवेल शहर पोलिसांचे भिकारीमुक्त अभियान..
पनवेल शहर पोलिसांचे भिकारीमुक्त अभियान

पनवेल / वार्ताहर : दि.१९ (संजय कदम)- गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. यातूनच छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या वाढल्या होत्या. या दृष्टीने पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली असून शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या भिकाऱ्यांविरूद्ध आता धडक मोहिम सुरू कऱण्यात आली आहे.
             
बाजारपेठ, एसटी स्टॅंड, उड्डाणपूलाखाली, रेल्वे स्थानक, विविध मंदिरे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकारी वावरत असून यात लहान मुलेही भीक मागताना गाडीच्या मागे धावतात. त्यातून अपघातही घडतो. हे सर्व टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे पनवेल शहर पोलिसांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली असून आज पनवेल परिसरातील २४ भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना मुंबई येथील कोर्टात हजर करण्यात आले. यापुढेही अशा प्रकारची कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.           

फोटोः पकडलेले भिकारी
Comments