पनवेल, दि.२४ (वार्ताहर) :- नैैना विभागात अनधिकृतपणे बांधकाम करणार्यांविरोधात आज धडक कारवाई करून सदर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
तालुक्यातील आकुर्ली गावाच्या हद्दीत नैना विभागात रस्त्याच्या मधोमध एक बांधकाम उभारण्यात आले होते. या बांधकामाविरोधात आज अतिरिक्त जिल्हाधिकारी खडके यांच्या मार्गदर्शनाखाली नैना अतिक्रमण विभागाचे सहा.नियंत्रक अनधिकृत बांधकामाचे अधिकारी गणेश झिने, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक ढाकणे, पोलीस अधिकारी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नैना अभियांत्रिक विभागाच्या राजूरकर आदींच्या पथकाने सदर विभागात आज ही कारवाई केली. यापुढे सुद्धा अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोट
अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेवू नये. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. नैना विभागाकडून येणार्या आगामी काळात अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई या विभागाचे प्रमुख खडके यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.
सहा.नियंत्रक अनधिकृत बांधकामे गणेश झिने
फोटो :- अनधिकृत बांधकामांवर करण्यात आलेली कारवाई