खासदार श्रीरंग बारणे यांचे व्यक्तिमत्व सतत फुलणारे - खासदार श्रीनिवास पाटील


 

खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान

 

पिंपरी /१६ फेब्रुवारी -  खासदार श्रीरंग बारणे नेहमी समाजाचा विचार करतात. जनतासमाजासाठी  झगडतात. त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ सर्वात मोठा आणि दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. मतदारसंघातील प्रश्नांसाठी संसदेत नेहमी भांडतात. देशाच्या सभागृहात प्रश्न मांडून  मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. खासदार बारणे यांचे व्यक्तिमत्व सतत फुलत राहणारे असल्याचे,गौरवोदगार माजी राज्यपालसाता-याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे  महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्नआदर्श व्यक्तिमत्वसंस्थांचा आणि कोरोना योद्ध्यांचा खासदार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी (दि.16) हा कार्यक्रम झाला. खासदार श्रीरंग बारणेसरिता बारणेसिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदारहातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशशिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडेशहरप्रमुख योगेश बाबरकामगार नेते इरफान सय्यदनगरसेवक नीलेश बारणेसचिन भोसलेनगरसेविका अश्विनी चिंचवडेमाजी नगरसेवक नारायण बहिरवाडेशशिकिरण गवळीमधुकर बाबरयुवा सेनेचे विश्वजित बारणेप्रताप बारणेधनाजी बारणेरवी नामदेबशीर सुतार उपस्थित होते. 

 खासदार बारणे हे शेतक-यांचा मुलगा असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणींची त्यांना जाण आहे. समाजाला काहीतरी देण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. आजही त्यांनी वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा गौरव केला असे सांगत खासदार श्रीनिवास पाटील यांनी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आठवण सांगितली. अध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूने सम-समान मते होती. असे असताना खासदार बारणे यांनी स्थायी समिती अध्यक्षपद मिळविण्याची कशी किमया घडविली हे अजूनही गुलदस्यात आहे. या राजकीय घडामोडीला खासदार पाटील यांनी उजाळा दिला.

 डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणालेदरवर्षी वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करतात. यंदाही त्यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. काही वर्षांपूर्वी माझ्या हस्ते बारणे यांचा आदर्श युवक म्हणून टिळक स्मारकात सत्कार झाला होता. आजही ते युवकच वाटतात. बारणे यांच्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व पिंपरी-चिंचवड शहराला लाभले आहे.

 खासदार श्रीरंग बारणे म्हणालेपिंपरी-चिंचवड शहराची जडणघडणचेहरामोहरा बदलण्यात श्रीनिवास पाटील यांचा मोटा वाटा आहे. २० वर्षांपूर्वी मी महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिला फोन पाटील यांचा आला होताहे मी कधीच विसरू शकत नाही.  २० वर्षे नगरसेवक आणि दोनवेळा खासदार म्हणून जनतेने निवडून  दिले. मी शहर जवळून पाहिले आहे.

 कोरोना काळात ज्यांनी मानव जातीची सेवा केला. त्यांचा गौरव केला आहे. कोरोना काळात माणूस माणसापासून दूर गेला होता. कोरोना योद्ध्यांनी माणुसकी जपण्याचे काम केले. डॉक्टरांनी अनेकांचे जीव वाचविले. कोरोना महामारीने मानव जातील खूप काही शिकविले आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावीअसे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरीश प्रभुणेअनेकांचा जीव वाचविणारे सिम्बॉयसिसचे डॉ. विजय नटराजनफ्रान्समधील ट्रायलथॉन स्पर्धा जिंकणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना महामारीचा सामना करत असताना सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा देणा-या कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टरपरिचारिकाआरोग्य कर्मचारीकोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेह बांधणारे,अत्यंविधी करणारे कर्मचारीमेडीकल असोसिएशनअन्नधान्य पुरविणारेप्लाझ्मा सेवा देणारी ब्लडबँकरुग्णवाहिका सेवा पुरविणा-या योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनात खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनचे गजानन चिंचवडेरवी नामदेबशीर सुतारधनाजी बारणे यांनी पुढाकार घेतला.

फोटो :- वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. डावीकडून श्रीनिवास पाटीलसरिता बारणेश्रीरंग बारणेशा.ब. मुजुमदार


Comments