तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग ...

पनवेल दि.९ (वार्ताहर)-तळोजा औद्योगिक वसाहतीतील एका केमिकल कंपनीला आज दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.          
या औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं.-३४ मधील इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक केमिकल कंपनीला आज दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील ११ अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले होते. आग नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीची झळ बाजूच्या कंपन्यांनासुद्धा बसली आहे. आग कशामुळे लागली व यात किती जखमी झाल्याची माहिती मिळाली नसून आग पूर्णपणे शमल्या नंतरच याबाबत सविस्तर सांगण्यात येईल अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.
         
Comments