पनवेल :- महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणाऱ्या अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे . हे प्रमाण कमी करण्याकरीता १ मार्च २०२१ रोजीपासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभाग प्रमुख डॉ.भूषणकुमार उपाध्याय , अपर पोलीस महासंचाक , म . रा . मुंबई यांचे संकल्पनेतून “ हायवे मृत्यूंजय दूत ” योजना राज्यात राबविण्यात येणार आहे .
भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात अंदाजे दिड लाख लोकांचा मृत्यू होतो . असे रस्ते अपघाताचे विश्लेषणात दिसुन आले आहे . अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना उपचाराकरीता योग्य वेळी रूग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रूग्णालयात नेतांना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तिच्या शरीरास अधिक इजा होते व मृत्यूचे प्रमाण वाढते . याकरीता गोल्डन अवर ( Golden Hour ) मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रूग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरीत मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्यूंजय दूत ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार असुन या योजनेची रूपरेषा खालील प्रमाणे आहे .
१. महामार्ग अखत्यारीतील महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल , पेट्रोलपंप , ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गाचे लगतच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करुन त्यांना मृत्यूंजय देवदूत नावाने संबोधण्यात येणार आहे .
२. या देवदूत व्यक्तिंना अपघातग्रस्त व्यक्तिस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देवून त्याच्या . प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहीत्य देण्यात येणार आहे .
३. महामार्ग अखत्यारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गानजिकच्या हॉस्पीटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अदयावत करण्यात येणार आहेत . ४. अॅम्बुलन्ससाठी १०८ हा दुरध्वनी क्रमांक आहे . याबाबत माहीती देवदूत याना देवून इतर खासगी व इतर रूग्णालयास संलग्न असणाऱ्या अॅम्बुलन्सची माहीतीसुध्दा देण्यात येणार आहे . ५. हायवे मृत्यूंजय दूत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येवू नये करीता त्याना महामार्ग सुरक्षा पथकांकाडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत
६. देवदूतांना पोत्साहन मिळावे करीता रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषीत केलेले “ Good Samaritan Award " चांगले काम केलेल्या देवदूतांना मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे .
७. आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेली स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना " या योजनेची सविस्तर माहीत संबंधीत नातेवाईक आणि संबंधीतांना देण्यात येणार आहे