पनवेल / दि.६ (वार्ताहर) :- पनवेल शिवसेना महानगर प्रमुख , जेष्ठ समाजसेवक, रामदास शेवाळे यांना नुकताच कोविड कोरोना योध्दा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक तसेच सकाळ वृत्त समूहाकडून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल कळंबोली येथील संत सावतामाळी विकास मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
रामदास शेवाळे यांच्या बिमा कॉम्प्लेक्स कळंबोली येथील कार्यालयात जाऊन संत सावता माळी विकास मंडळ कळंबोली या संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष लहू शेठ मलकमिर, सेक्रेटरी श्रीनिवास शिरसागर कार्याध्यक्ष उद्धव भुजबळ, उत्तम शिंदे, बाळासाहेब राऊत, पिंपळेश्वर ननावरे, ईश्वरभाऊ जाधव, दत्तात्रय शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
फोटो ः शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचा विशेष सत्कार करताना संत सावतामाळी विकास मंडळाचे पदाधिकारी.