पनवेल / वार्ताहर : दिनांक ७ फेब्रूवारी २०२१, बीएसपी तर्फे पनवेल मध्ये 'कही हम भूल ना जाए' अंतर्गत माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता फातिमा शेख, माता रमाई ह्या बहुजन महानायिकांची संयुक्त जयंती संपन्न झाली.
सदर कार्यक्रमास मुस्लिम भाईचारा म्हणूण इक्बाल इब्राहिम नावडेकर ( बहुजन वंचित विकास संस्था, जनरल सेक्रटरी महाराष्ट्र राज्य) तसेच अललामभाई खोत, माळी समाज भाईचारा म्हणून रुपालीताई शिंदे (क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्षा ) यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पनवेल विधानसभा संगठन बांधनी अंतर्गत खालिल महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ,नलिनी भाटकर -अध्यक्ष पनवेल विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
१) रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून सुनंदाताई अलोणे.
२) ललिताताई निंबाडे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष
३) लिलाताई हरले, कामोठे महिला शहर अध्यक्ष
४) अर्चना टेंबेकर, कोप्रोली सेक्टर अध्यक्ष
५) शोभा मिठगावकर, पंचशीलनगर नविन पनवेल अध्यक्ष)
६) रंजना नागदेवे नविन पनवेल (पूर्व) अध्यक्ष
७) कविता वंदना शिवशरण, नविन पनवेल, महासचिव.
सदरचा कार्यकम विशेष करुन महिलांनी आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमास बीएसपी चे खालील पदाधिकारी उपस्थित होते. ऍड.संजय कानडे -प्रदेश कार्यकारनि सदस्य, ऍड.अनिल नागदेवे रायगड जिल्हा प्रभारी, फुलचंद किटके- रायगड जिल्हा प्रभारी, नलिनी भाटकर -अध्यक्ष पनवेल विधानसभा, खंडू लहाणे -कोषाध्यक्ष पनवेल विधानसभा, राजू दहाट-प्रभारी पनवेल विधानसभा,जंयती नाईक-सचिव पनवेल विधानसभा आदी उपस्थित होते..