खारघर दि.२६. थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकरांना शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महाराष्ट्र मंडळ अंदमान निकोबारचे आजीव सदस्य सल्लागार शिवसैनिक विष्णू गवळी, विधानसभा संघटक दिपक निकम, शिवसेना रायगड समन्वयक अनिल चव्हाण, उप महानगरप्रमुख दीपक घरत, यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर प्रमुख डी. एन. मिश्रा. खारघर शहर प्रमुख शंकर ठाकूर असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, भाजपच सावरकर प्रेम बेगडी आहे,हे फक्त राजकारणासाठी व स्वार्थासाठी सावरकरांच्या नावाचा वापर करतात असे सावरकर रत्न विष्णू गवळी यांनी व्यक्त केले सावरकरांना भारतरत्न मिळेपर्यंत पाठपुरावा करतच राहू असे जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि विष्णू गवळी यांनी स्पष्ट केले आहे.