१५ हजाराची लाच स्वीकारताना म.रा.वि.वि. कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना रंगेहाथ पकडले


पनवेल, दि.२२ (वार्ताहर) :-  वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे १५ हजाराची लाच मागितली. याप्रकरणी सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केल्यानंतर आज सायंकाळी सापळा रचून सदर कार्यकारी अभियंत्यांला सदर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार नोकरी करीत असलेल्या श्री म्हाळसा एंटरप्रायझेस या कंपनीमार्फत नेरळ येथील बांधकामाच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविले. नंतर वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देण्याकरिता आरोपी लोकसेवक कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपनी लि. पनवेल ग्रामीण (वर्ग-1) चे शैलेशकुमार कांबळे (52) यांनी १५ हजाराची लाच मागितली व सदर लाच स्वीकारताना आज त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक श्रीमती.ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली पो.हवा.पवार, पो.हवा.परदेशी, चापोहवा गायकवाड, पो.ना.फडतरे, पो.ना.ताम्हाणेकर आदींच्या पथकाने पकडले आहे. 

चौकट
पनवेलसह नवी मुंबई हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असेल तर तात्काळ यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई दूरध्वनी 2783344 किंवा मो.नं.9967438202, टोल फ्री क्र.1064 येथे संपर्क साधावा.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image