पनवेल, दि.२६ (संजय कदम) ः पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात २ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एका रिक्षाने पांडुरंग करमेळकर (64) यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर दुसर्या घटनेत काळुंद्रे फाट्या समोर असलेल्या झुनझुनवाला पेट्रोल पंपासमोर पुष्पा पाटील (35) या स्कुटीवर जात असताना समोरुन विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पाने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.