कंटेनरची मोटारसायकलीस धडक ; महिलेचा मृत्यू


पनवेल दि.१६ (वार्ताहर)- भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जेडब्लूआर कंपनीसमोर मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
       
कंटेनर चालक बबलू प्रजापती (वय-३२) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर पनवेल ते उरण मार्गाने जात असताना जेडब्लूआर कंपनीसमोर मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात अश्विनी दोरूगडे हिचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments