ए/२ अंतर्गत कामांची मर्यादा १५ लाखापर्यंत करण्यात यावी स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संस्था खारघर विभागची मागणी
पनवेल, दि.२१ (वार्ताहर) :-  सिडको खारघर-ओवे विभाग स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संघटनेच्या बैठकीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना ए/२ अंतर्गत कामांची मर्यादा १५ लाखापर्यंत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन परिक्षक अभियंता खारघर सिडको अभियंता यांना संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांनी दिले.
स्थानिक प्रकल्पग्रस्तांना ए/2 अंतर्गत कामांची मर्यादा 15 लाखापर्यंत करण्यात यावी. तसेच या कामांचे कोटेशन नोटीस बोर्डावर न लावता अनुभवी स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना समप्रमणात कामांचे वाटप करून देण्यात यावे. खारघर-ओवे परिसरातील प्रामुख्याने खारघर, कोपरा, बेलपाडा, मुर्बी, ओवे, पेठ, रांजणपाडा, खुटुक बांधण, इनामपुरी या गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या ठेकेदारांना खारघर नोडमध्ये ए/2 योनजेंतर्गत कामे देण्यात येवू नयेत. तसेच मागील आर्थिक वर्षात पावसाळ्यापूर्वीची कामे ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त एजन्सीला देण्यात आली होती. त्याच एजन्सीला संधी देण्यात यावी, अशी माफक मागणी प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या ओशासनांची पुर्तता न झाल्यामुळे भविष्यात अडीअडचणी बाबत चर्चा करून कायमस्वरुपी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून खारघर सिडको विभाागातील संबंधित अधिकारी व स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार यांची समन्वय बैठक बोलाविण्यात येवून योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संस्था खारघर विभाग अध्यक्ष भरत पाटील यांनी अधिक्षक अभियंता खारघर सिडको विभाग यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
फोटो ः भरत पाटील
Comments