महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने जनजागृती कार्यक्रम...

पनवेल / वार्ताहर :- आर्या वनौषधीचा जनजागृती कार्यक्रम महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने  पनवेल,पेण,अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संस्थेच्यावतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली .                             
संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की ,महाशिवरात्रीला महादेवास बिल्वपत्र, बिल्वफळ,धोत्रा फुल- फळ, कवठ, आंबा मोहर, पळसफुले वाहतात. मानवी जीवनात या पाना- फुलांना एक उच्च स्थान आहे. या मध्ये अनेक औषधी गुण पाहूनच त्यांचा समाविष्ट ऋषीमुनींनी ईश्वर पुजेकरीता केला. देवाला वाहण्याच्या निमित्ताने या वनस्पती सहज हाताळल्या जाऊन त्यांच्या गुणांचा माणसाला निश्चितच फायदा होतो.या पाना- फुलांना नुसतेच धार्मिक महत्व नाही, तर आयुर्वेदिक सुद्धा खूपच महत्व आहे.या कार्यक्रमात सुधीर पाटील यांनी कवठ,आंबा मोहर, धोत्रा , पळसफुले, बेल यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती दिली. यावेळी  मनस्वी घरत, आर्या पाटील यांच्या हस्ते महाशिवरात्र व आयुर्वेद या विषयांवर आधारित असलेली पत्रके वाटप करण्यात आली . या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास शिवभक्तांचा  उदंड प्रतिसाद लाभला.




Comments