बीपीनकुमार सिंह पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी पनवेल शहरातील नागरीकांशी संवाद साधला.
पनवेल, दि.२४ (संजय कदम) ः बीपीन कुमार सिंह, पोलीस आयुक्त नवी मुंबई योनी वार्षिक तपासणी निमीत्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट दिली. भेटी दरम्यान पोलीस आयुक्तांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कामकाजाचा आढावा घेतला.
पोलीस आयुक्तांनी पनवेल शहरातील डॉक्टर्स, व्यापारी, शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक, सर्व धार्मिक स्थळांचे प्रतिनिधी व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सुमार 25 नागरीकांशी कोरोनचे पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करुन संवाद साधला. सदर मिटींग दरम्यान नागरीकांनी लाईनआळी, एम.जी. रोड व नवीन कोर्ट या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या उपस्थित करुन व झवेरी मार्केट येथे पोलीस नेमण्याची मागणी केली. तसेच करंजाडे ओनर्स असोशिनचे पदाधिकारी यांनी त्यांचे असोशिएशन तर्फे करंजाडे परीसरातील मुख्य चौकात व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घेणार असल्याबाबत सांगीतले. सदर वेळी पोलीस आयुक्तांनी नागरीकांना कोरोनाचे पाश्‍वभुमीवर शासनाचे नियमांचे पालन करण्याबाबत पोलीसांना सहकार्य करण्याबाबत विनंती केली. तसेच नागरीकांनी उपरिथत केलेल्या समस्यांवर कार्यवाही करण्याची हमी दिली. पनवेल मधील नागरीकांच्या सहकार्यामुळेच पनवेल पोलीस स्टेशनचे एकंदरीत कामकाज चांगले असल्याचे सांगुन पनवेल मधील गुणे हॉस्पीटल मधील सीसीटिव्हीच्या आधारे उरण पोलीस ठाण्यातील 2 महीन्याच्या बाळाचा अपहरणाचा गुन्हा उघडीस आल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांनी भेटीदरम्यान पनवेल शहर पोलीस स्टेशन नेमणुकीतील सर्व अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेतला. सदर दरबारामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या जाणुन घेवुन त्यांच्या समस्यांचे निरसन केले. कोरोनाचे पार्श्‍वभुमीवर शासनाचे नियमाचे पालन करण्याबाबत सुचना द्ल्या व पोलीस दलाचे कामकाजा बाबत मार्गदर्शन केले जनतेकडुन प्राप्त होणा-या करांतुन पोलीसांना पगार मिळत असल्याने पोलीसांनी आपली जनतेशी चांगली वर्तणुक ठेवण्याबाबत सुचित केले. तसेच पोलीसांनी प्रलोभंनाना बळी न पडण्याबाबत व कीतीही मानसिक ताण आल्यास स्वःताला व कूटुंबाला त्रास होईल असे आत्मघातकी पाऊल उचलु नये असे सांगुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल उचवंण्याचा प्रयत्न केला. बीपीन कुमार सिंह, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे सदर वार्षिक भेटीचे वेळी शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2, पनवेल, नवीमुंबई हे उपस्थित होते.

फोटो ः पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह मार्गदर्शन करताना.
Comments