पिसार्वे गाव परिसरातून हेरॉईन अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या दोघांना घेतले ताब्यात

पनवेल / दि.२५ (संजय कदम) ः तळोजा येथील पिसार्वे गाव परिसरातमध्ये हेेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
जसविंदर दलजित सिंग (28) व साबिर रजाक पठाण (23) अशी या दोघांची नावे असून गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांजवळ असलेले 103 ग्रॅम वजनाचे 10 लाख 30 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन तसेच त्यांनी या गुन्ह्यात वापरलेलेलेली स्कुटी व पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे. तळोजा येथील पिसार्वे गावाजवळ असलेल्या साई शांती पार्क, आनंद बिल्डींग जवळ दोन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर,अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छाप्रिया, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने तळोजा येथील पिसार्वे गावाजवळ सापळा लावला होता. यावेळी आरोपी जसविंदर दलजित सिंग हा होंडा स्कुटीवरुन तर साबिर रजाक पठाण हा पल्सर मोटारसायकलवरुन साई शांती पार्क आनंद बिल्डींग जवळ संशयास्पदरीत्या येऊन थांबल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची धरपकड केली. 
त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांची झडती घेतली असता, जसविंदर सिंग याच्या जवळ 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 62 ग्रॅम हेरॉईन तर साबिर रजाक पठाण याच्याजवळ 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 41 ग्रॅम हेराईन आढळुन आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्यांनी अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांवर तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. तसेच त्यांनी या गुह्यात वापरलेली स्कुटी व पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे. सदरचे अंमली पदार्थ त्यांनी कुठून आणले व ते कुणाला विकणार होते, याबाबत गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image