देवयानी मोकल शिक्षिकेचे सुयश

कळंबोली / वार्ताहर पनवेल तालुक्यातील भातान येथील सु.ए.सो.पालीचे माध्यमिक विद्यालय भाताण  या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका देवयानी मोकल  (Msc Bed DSM) यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद( विद्या प्राधिकरण) पुणे यांच्यामार्फत सन २०२०-२०२१ आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी  ''लाॅकडाऊनच्या काळात तंञज्ञानाच्या साह्याने गणित शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी ''  हा नवोपक्रम सादर केला होता .त्या स्पर्धेत जिल्हास्तरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे .त्याच प्रमाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल रायगड यांच्या वतीने सु.ए.सो.सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे पेण या शाळेत गणित विषयासाठी आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत यशोगाथा माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. देवयानी मोकल यांनी मिळवलेल्या यशाबद्दल  पनवेलमधील डायट प्रशिक्षण संस्था पनवेल कडून दोन्ही स्पर्धेमध्ये प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पनवेल यावेळी
प्राचार्य सौ चंद्रकला ठोके ,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.संजय वाघ ,जेष्ठ अधिव्याख्याता  सागर तुपे,ममता पवार (अधिव्याख्याता ), राजेश लठ्ठे अधिव्याख्याता ,श्रीमती सुनिता राठोड अधिव्याख्याता ,श्री रामदास टोणे अधिव्याख्याता अधिव्याख्याता श्री.संतोष दौंड (गटशिक्षणाधिकारी कर्जत) विषय सहाय्यक श्रीमती मनीषा खैरे , श्रीमती सोनल गावंड, सर्व विषय सहाय्यक उपस्थित होते .त्यांचे संस्था अध्यक्ष वसंत ओसवाल, उपाध्यक्ष  रविंद्र लिमये सचिव रविकांत घोसाळकर स्कूल कमिटी चेअरमन वसंत काठावले मुख्याध्यापक प्रशांत मोकल शिक्षक  ग्रामस्थांनकडून  त्यांचे  अभिनंदन केले आहे.
Comments