पनवेल, दि.११ (वार्ताहर) :- जन्मजात हृदयविकार झालेल्या मुलांवर विनामुल्य शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने आज त्यांच्या चेहर्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहर्यावर जे आनंदाचे हास्य आहे ते हास्य मी काढलेल्या द्विशतकापेक्षाही मोठे असून या गोष्टीचा मला मनापासून आनंद होत असल्याचे मत खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, पद्मभूषण लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
कोविड १९ च्या महामारीमुळे आरोग्य सेवा तसेच जगभरातील सामाजिक आणि आर्थिक अशा सर्वच बाबींवर मोठा ताण आला आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लॉकडाउन पाळण्यात आला होता. यामुळे जन्मजात हृदय रोग (सीएचडी) असलेल्या मुलांना उचारास मुकावे लागत होते. या साथीच्या वेळी, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे नितीन मेहता यांनी २.१ कोटी रुपये जमा करून खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर सेंटर येथे जन्मजात -हदयविकाराने ग्रस्त असलेल्या १५० मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले.
दरवर्षी सुमारे २,५०,००० मुले हृदयविकाराच्या समस्येसह जन्माला येतात आणि यातील केवळ ५०,००० मुलांवर उपचार केले जातात. त्यातील २५% टक्के मुलांना जीव गमवावा लागतो आणि इतर बालकांना उपचाराविनाच आयुष्य काढावे लागते. लॉकडाऊन कालावधीत अनेक रुग्णालयांनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचे थांबविले होते. कर्मचारी, उपकरणे तसेच शस्त्रक्रिया विभागाची उपलब्धता अनेक बालरुग्णांवर उपचार झाले नाही. मात्र रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष नितीन मेहता आणि साथीदार क्लब रोटरी क्लब ऑफ फोर्ट वेन, यूएसए, रोटरी डिस्ट्रिक्ट्स३१४१ आणि ५३६० आणि रोटरी इंटरनॅशनल कडून जागतिक अनुदानाने २,९३,००० डॉलर्स जमा केले. ३० ऑक्टोबर २०२० पासून श्री सत्य साई संजीवनी चाईल्ड केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, खारघर, नवी मुंबई येथे बालरोग शस्त्रक्रियेसाठी क्लबकडून ५२,५०० डॉलर्सचे योगदान दिले गेले आहे. श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सी. श्रीनिवास म्हणाले, कोविड महामारीच्या काळात जन्मजात -हदयरोग असलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे आम्ही आभारी आहोत. ऑगस्ट २०२० पासून ते आतापर्यंत सुमारे ६८ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, मे २०२१ पर्यंत आम्ही आणखी १०० शस्त्रक्रिया करून यावर्षी सुमारे ७५० शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असून पुढील वर्षापासून ते १८०० ते २००० रूग्णांवर उपचार करण्याचा आमचा मानस आहे. वंचित भागातील सीएचडी सारख्या आजारावर मात करण्यासाठी योग्य प्रशिक्षण तयार केले पाहिजे आणि स्थानिक प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी आणि प्राथमिक टप्प्यात रोगनिदान करण्यासाठी चांगल्या वैद्यकीय संसाधनांचे वाटप केले जावे अशी प्रतिक्रिया श्री. श्रीनिवास यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ बॉमे एअरपोर्टचे अध्यक्ष श्री नितीन मेहता सांगतात की, गिफ्ट ऑफ लाइफ सर्टिफिकेट या प्रकल्पातील उद्दीष्ट म्हणजे गरजना त्यांच्या जाती, पंथ, धर्म किंवा वंश याची पर्वा न करता मदत करणे असे आहे. जन्मजात हृदय विकार तसेच बालरुग्णांची काळजी घेणे हे आर्थिकदृषच्या कमकुवत असलेल्या नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने अशा मुलांवर वेळीच उपचार केले जात नाही. हे उपचार सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्यानेही अनेक समस्या उद्भवतात.
प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील या उपक्रमास पाठींबा देण्यासाठी याठिकाणी उपस्थित होते. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील पालकांना खासगी रुग्णालयात खास वैदयकीय सेवा मिळविणे अधिक कठीण जाते. जन्मजात -हदयरोग असलेल्या मजदुरांच्या मुलांच्या ही शस्त्रक्रिया परवडणारी नसते त्यामुळे अनेकांना प्राण देखील गमवावे लागतात. अशा मुलांच्या उपचाराकरिता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कॉपरिट्स आणि एचएनआयच्या सक्रिय प्रतिसादांची गरज आहे. यावेळी अनेक क्रिकेटपट्टू हे सामाजिक कार्यात रस घेताना दिसत आहेत, तर अजूनही नव्या उमेदीच्या क्रीडापट्टूना सामाजिक बांधिलकी जपून पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल हार्ट केयर, खारघर येथील बाल -हदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. रश्मी प्रभात यानी याठिकाणी -हदयविकाराने त्रस्त रुग्णांच्या जीवनप्रवासाचा उलगडा केला. लॉकडाऊन दरम्यान, संजय कुमार धार यांनी ओरिसा ते मुंबई येथे रूग्णालयात पोहोचण्यासाठी जवळजवळ एक आठवडा प्रवास केला. जन्मजात हृदयरोगामुळे त्रस्त असलेला त्याच्या मुलाचा जीव वाचावा या अपेक्षेने त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. डॉक्टरांच्या टिमने या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तसेच जन्मजात हार्ट डिसीज असलेल्या आपल्या ९ महिन्याच्या बाळासह वडील आणि गर्भवती आई अकोला (महाराष्ट्र) ते खारघर असा दुचाकीवरुन प्रवास करत आपल्या बाळाला नवीन आयुष्य मिळवून दिले. मोटरसायकलवरून सुमारे ७०० किलोमीटर अंतर पार करून त्यांनी आपल्या मुलावर शस्त्रक्रिया करून घेतली. या सर्व पालकांच्या डोळ्यांतून काल आनंदाश्रू झळकताना पाहुण्यांसह उपस्थितांची मने हेलावून गेली.
फोटो ः जन्मजात हृदयविकार झालेल्या मुलांचे कौतुक करताना सुनील गावस्कर यांच्यासह इतर उपस्थित मान्यवर.