तीन मोटार सायकलची चोरी..

पनवेल / दि.१२ (वार्ताहर) :-  पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन तीन मोटार सायकली चोरीस गेल्याची घटना घडल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
करंजाडे येथे प्रकाश सरवणकर यांनी त्यांची होंडा कंपनीची २० हजार रुपये किंमतीची मोटार सायकल अ‍ॅपेक्स व्हिला परिसरात उभी करून ठेवली असता सदर मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. 

तर दुसर्‍या घटनेत नितेश भगत, भगतआळी पनवेल यांनी त्यांची लाईन आळी येथील हनुमान मंदिरसमोर होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा ही गाडी ज्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. 

तसेच तिसर्‍या घटनेत प्रमोद गायकवाड रा.करंजाडे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर जिची किंमत २० हजार रुपये इतकी आहे ही ओरियन मॉलच्या बाजूला विजय सेल्ससमोर उभी करून ठेवली असता तिची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. पनवेल परिसरातून गेल्या काही दिवसात दुचाकी व चार चाकी वाहन चोरीस जाण्याचे प्रकार वाढल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
Comments