रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी सिताताई पाटील ...
सुजाता वारंगे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी
जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट
पनवेल, दि.२६ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुजाता वारंगे यांच्याकडे देण्यात आली. या निवडीबद्दल पाटील आणि वारंगे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कबड्डीची कर्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात सॉफ्ट टेनिस या आंतरराष्ट्रीय खेळाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन काम करीत आहे. या जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडू तयार होऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवावी. यातून जिल्ह्याचे व आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करावे या अनुषंगाने असोसिएशनने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या खेळाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले जातील असे पाटील यांनी सांगितले. असोसिएशनच्या सचिवपदी स्वप्नील वारंगे, सहसचिव म्हणून श्‍वेता वळुंज, हेमंत पेयर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया गांगण सहखजिनदार म्हणून काम पाहतील. नंदू वारगुटे, विशाल खुटवड, यतीराज पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.







Comments