पनवेल, दि.१३ (संजय कदम) :- पनवेल परिसरातून दोन मोटार सायकलची चोरी झाल्याची घटना घडल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ब्रीजच्या खाली अमित साबळे यांनी उभी करून ठेवलेली लाल रंगाची अॅक्टीव्हा स्कूटी गाडी ज्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. ती चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तर दुसर्या घटनेत गणेश साठे यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरोहोंडा पॅशन मोटार सायकल जीची किंमत २० हजार रुपये इतकी आहे ही एलएक्सआर स्पेशालिटी ऑईल प्रा.लि. कंपनीच्या गेट बाहेर पडघे गाव येथे उभी करून ठेवली असता सदर वाहनांची चोरी झाल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.