विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई



विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई...
पनवेल दि.१८ (संजय कदम)- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोव्हिड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे माहीत असूनही विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, खांदेश्वर, कळंबोली, खारघर या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अशांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
         
 कोरोना या विषाणूंचा संसर्ग होऊन साथ पसरण्याची शक्यता असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता शासनाच्या संचारबंदीचे आदेश असतानाही विनाकारण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व व्यावसाय करणाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचे उल्लंघन करून हयगयीने व बेदरकारपणे मानवी जीवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून भांदविस कलम २६९, १८८ सह आपत्ती व्यवस्थापन आदी. कलम ५१ब प्रमाणे कारवाई करण्यात येत असल्याने अशा व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.
Comments