पनवेल / वार्ताहर :- शिवसेनेचे नवीन पनवेल विभाग प्रमुख उमेश (मनू) भगत यांनी ओम साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक मार्चपासून सर्वसामान्यांना परवडणारी शाकाहारी थाळी सुरू केली आहे. त्याची किंमत वीस रुपये एवढी नाममात्र ठेवली आहे.
नवीन पनवेल येथील सेक्टर-१९, पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या जागेत त्यांनी शाकाहारी थाळी सर्वसामान्यांसाठी सुरू केली आहे. ओम साईनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष असून ट्रस्टमार्फत नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करत असतात. वीस रुपयांमध्ये शाकाहारी थाळी सुरू केल्याने सर्व नागरिक त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद देत आहेत.