"ग्रंथ भेट -एक वाचन संस्कार"
कु. गार्गी रेवती वसंत सोमण यांजकडून 
सुमारे ७ हजार रुपये किंमतीची इंग्रजी- मराठी भाषेतील १०० पुस्तके फडके विद्यालयास भेट . 

पनवेल / वार्ताहर :- म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल, येथे दि.१० मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, ज्ञानवसा संवर्धित करण्यासाठी तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी प्रयत्न म्हणून गुळसुंदे येथील कु.गार्गी रेवती वसंत सोमण यांनी विद्यालयास ग्रंथभेट दिली. 
आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी अशा विविध विषयांवरील सुमारे ७०००/- रुपये किंमतीची इंग्रजी- मराठी भाषेतील १०० पुस्तके विद्यालयास भेट म्हणून दिली. 

"या ग्रंथसंपदेमुळे विद्यार्थ्यांमधील वाचन आवड नक्की वृद्धिंगत होईल", असा विश्वास विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा समिता सोमण यांनी व्यक्त केला.
Comments