३७ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी....जुन्या आठवणींना दिला उजाळा : एकमेकांशी साधले हितगुज
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांचा पुढाकार

पनवेल,(प्रतिनिधी) -- शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र 37 वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर  प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि तब्बल 37 वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली  ती माजी विद्यार्थ्यांच्या भेटीच्या निमित्ताने....नवी मुंबई स्कूल वाशी नवी मुंबईच्या विद्यालयामधून 1983-84 या शैक्षणिक वर्षात बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी एक दोन नव्हे तर चक्क 37 वर्षांनी पुन्हा एकत्र आले. तळोजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी, शेअर मार्केटमधील किरण औटी यांनी पुढाकार घेत आपल्या जुन्या मित्राना भेटण्याचे नियोजन यांनी केले. त्यानुसार नवी मुंबई येथील नवरत्न हॉटेलमध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला. 1983-84 पासूनचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत विद्यालायावरील आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. या विद्यालयातून हे विद्यार्थी 1983-84 साली केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत, यातील काही बडे राजकारणी, पोलीस, शेअर मार्केट तसेच विविध क्षेत्रात आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका, समाजसेविका त्याच प्रमाणे आदर्श  गृहिणी आहेत. ज्यांच्या ऋणानुबंध आजही  या शाळेशी जोडलेला आहे. अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

बऱ्याच दिवसांपासून माजी विध्यार्थ्याना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यानुसार महाविद्यालयाचे विद्यार्थीना1983-84 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आणत आठवणींना उजाळा दिला. हे विद्यार्थी तब्बल 37 वर्षांनी एकत्र आले होते. सर्वांनी आस्थेने एकमेकांची चौकशी केली. शालेय शिक्षणानंतर आपापल्या ध्येयप्राप्तीच्या वाटेवर निघून गेलेले हे सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांनी आनंद झाला.
- लक्ष्मीकांत मोटवानी - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई
Comments