युवासेना आणि CAT तर्फे राबविली जाणार मोफत क्रिकेट योजना...
मुंबई / वृत्तसेवा :-  गावागावात आणि खेडोपाडी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना मोफत क्रिकेट शिकविणे, त्यांना खेळाचे मोफत साहित्य पुरविणे व त्यांच्यातील खरे खेळाडू पारखून त्यांना युवासेना संचालित व क्रिकेट असोसिएशन ऑफ तेलंगणा (CAT) तर्फे पुढील प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे सुनील बाबू यांची ही संकल्पना असून ह्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचे योगदान लाभले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई व शिवसेना सचिव सुराजभाई चव्हाण यांच्या सुचनेने ही योजना लवकरच युवासेनेच्या माध्यमातून राबविली जावी असे निवेदन आज युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिले.
यावेळी CAT यांनी दिलेली क्रिकेट बॅट त्यांना भेट देण्यात आली . 
Comments