कळंबोली पोलीसदल ऍक्शन मोडवर ; गजबजलेली कळंबोली केली अर्ध्या तासात शांत.
कळंबोली / दिपक घोसाळकर : कोरोनाचा प्रादुर्भाव कळंबोली वसाहतीमध्ये वाढत आहे. लॉकडाऊन मध्ये शासनाने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन हजारो नागरिक कळंबोली मध्ये मुक्तपणे संचार करीत होते  अनेक दुकाने ही गजबजलेली दिसून येत होती  मंडई , बाजारपेठा, रस्ते, नागरिक व वाहनांनी हाऊसफुल झाली होती .मात्र शासनाकडून आदेश प्राप्त होताच कळंबोली पोलीस दल ॲक्शन मोडवर आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कळंबोली निर्मनुष्य करण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांनी याबाबत कळंबोली पोलिसांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत.
         
करोनाच्या दुसरा लाटेचा प्रादुर्भाव कळंबोली मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे .दररोज सत्तर ते ऐंशी नवीन रुग्ण  पॉझिटिव्ह सापडत आहेत. एकीकडे लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.मात्र नागरिक याबाबत सतर्क राहत नसल्याचे दिसून येत आहे .शासनाने लॉक डाऊन घोषित केला मात्र या काळात काही जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलतही देण्यात आली.मात्र याच सवलतीचा गैरफायदा घेऊन बिनदिक्कत पणे नागरिक मोठ्या प्रमाणावर कळंबोली मध्ये वावरताना ,फिरताना दिसून आले .पदपथावर काही विक्रेते बसलेले दिसून आले तर भाजीमंडई बाजारपेठा दुकाने हाऊसफुल असल्याचे चित्र गुरुवारी सकाळी पहावयास मिळत होते .याबाबत पनवेल महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी चिंता व्यक्त करीत होते. मात्र शासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घोषित केल्यानंतर कळंबोली पोलीसदलही ॲक्शन मोडमध्ये आले. पनवेल महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व कळंबोली पोलिस यांच्या संयुक्त सहकार्यातून कळंबोली मध्ये पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच गजबजलेली कळंबोली भाजी मंडळी शांत झाली .तर रस्त्यावरची वाहने ताबडतोब बंद झाली . वसाहतीमधील सर्व दुकाने वैद्यकीय सेवा वगळता बंद करण्यात आली .गजबजलेली कळंबोली पूर्णपणे शांत करण्यात पोलिसांना चांगले यश आले आहे .या कामगिरीबद्दल येथील नागरिक कळंबोली पोलिसांना धन्यवाद देत आहेत.
 
Comments