स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकन पक्ष रायगडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
पनवेल / दि. १४ :- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्ह्याच्या वतीने व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे तसेच ज्या प्रकारे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहराला केंद्रबिंदू संबोधले जाते या प्रवेशद्वार पासून महाराष्ट्रतले अनेक भीम अनुयायी महाड चवदार तळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असतात, या ठिकाणी पनवेल शहराच्या मध्यभागी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे गेल्या वर्षी या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अशा प्रकारची भूमिका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन यांच्या कडे मागणी करून निवेदन देण्यात आले होते तसेच या नंतर लगेचच प्रशासनाने महासभेत बैठक घेऊन उपमहापौर जगदीश गायकवाड साहेब यांनी या मागणीची चर्चा करून मुद्दा उचलून धरला व काही दिवसात त्यांनी त्याचे टेंडर प्रशासनाकडून मंजूर करून घेतले व पुतळ्याचे चांगल्या प्रकारे, सुंदर अश्या प्रकारचे सुशोभीकरण केले त्या पुतळ्याचे उदघाटन पनवेल आमदार प्रशांत ठाकूर साहेब, पनवेल महानगरपालिकाचे महापौर डॉ कविता चौतमौल, उपमहापौर जगदिश गायकवाड, पनवेल आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी त्यांचे व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत त्यावेळी उपस्थित पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे,  अविनाश अडागळे सामाजिक अंतर राखून प्रशासनाच्या नियमाचे पालन करून अभिवादन केले.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image