राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आज कळंबोलीमध्ये भव्य रक्तदान शिबीर ..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद 
 

पनवेल वैभव : (राज भंडारी)  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे शिवसेनेचे पनवेल उपमहानगर प्रमुख कैलास बबनदादा पाटील आणि कळंबोली शहर शिवसेनेतर्फे रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत तसेच इतर सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक २१ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास बबनदादा पाटील यांनी दिली. 

मार्च २०२० पासून राज्यात कोरोनाचा कहर आणि त्यानंतर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करून उत्तम नियोजन करू शकते हे सिद्ध झाले आहे. यामागे राज्य सरकारचे यश जितके आहे तितके महाविकास आघाडी सरकारच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा राज्य सरकारला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने रक्तसाठा काही दिवस पुरेल याबाबत सांगण्यात आले. आणि म्हणून शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच शहर व विभागप्रमुख यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी पुन्हा रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान असल्याची भावना मनामध्ये रुजवून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. 

या आवाहनाची दखल घेऊन कळंबोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी भव्य असे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे बुधवारी २१ एप्रिल रोजी हे महारक्तदान शिबीर पार पडणार असल्यामुळे याबाबत शिवसेनेचे कळंबोली शहरप्रमुख डि. एन. मिश्रा यांच्याशी रक्तदात्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments