तिघा जणांची इसमास मारहाण...
तिघा जणांनी केली एका इसमास मारहाण

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेलजवळील तळोजा फेज-1 राणा हॉस्पिटल बाजूच्या गार्डनच्या मेन गेटजवळ एका इसमास तीघा जणांनी छोट्याशा कारणावरुन मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तुफेल रईस खान (20 रा.तळोजा गाव) हा राणा हॉस्पिटल बाजूच्या गार्डनच्या मेन गेटजवळ उभा असताना तीघा जणांनी गेटसमोर उभा राहू नकोस असे सांगितले असता तुफेल खान याने में जा रहा हू, बैठने के लिया थोडा आया हू, असे बोलल्याने या तीघा जणांना राग आल्याने त्यांनी त्याला शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण केली आहे. तसेच डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments