पनवेल येथे कोव्हीड हॉस्पिटल तात्काळ उभारण्याची जिल्हा सल्लागार बबन पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढत असून त्यासाठी पनवेल येथे कोव्हीड हॉस्पिटल तात्काळ उभारण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, एक वर्षानंतर थोडा फार शांत झालेल्या कोव्हीडने गेल्या 15 दिवसापासून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. महाराष्ट्रासह पनवेल तालुक्यातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीत कोव्हीड रुग्णांची संख्याा ही झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी शासनाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका हद्दीत कळंबोली येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु सदर हॉस्पिटलमध्ये पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विविध भागातून कोव्हीड रुग्ण हे उपचारासाठी पनवेलमध्ये येत असतात. त्यामुळे रुग्णांचा वाढता रेटा पाहता ते फार अपूरे आहे. सध्या हॉस्पिटलचा तुटवडा भासत असून कोव्हीड रुग्णांना बेड मिळणे व खास करून आयसीयु बेड तसेच व्हेंटीलिटर बेड मिळणे मोठ्या जिकरीचे झाले आहे. अशा अवस्थेत पनवेल व रायगड वासियांच्या मदतीसाठी सिडकोच्या माध्यमातून 200 बेडची आयसीयू व व्हेंटीलिटरयुक्त असलेले रुग्णालय उपलब्ध करून द्यावे अशी विनंती शिवसनेनेसह महाविकास आघाडीच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Comments