पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः स्वतःच्या ताब्यातील हॉटेल चालू ठेवून ग्राहकांना प्रत्यक्षरित्या खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने कामोठे पोलिसांनी सदर हॉटेल चालकाविरुद्ध कारवाई केली आहे.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 12 या ठिकाणी श्राजेश बांभरकर याने सुमंगा हॉटेल या ठिकाणी चालू ठेवून ग्राहकांना प्रत्यक्षरित्या खाद्यपदार्थ विक्री केल्याने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने महाराष्ट्र शाासनाने व पनवेल महानगरपालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले व कोरोना विषाणू पसरविण्याची घातक कृती केली म्हणून त्याच्याविरुद्ध भादवीस क्र.188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन अधि.क.51 ब, महाराष्ट्र कोव्हिड 19 विनियमन 2020 चे क.11, साथ रोग प्रतिबंध अधि क.3 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.