वृद्ध महिलेची केली फसवणूक
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः टपरी बसलेल्या एका वृद्ध महिलेस दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरुन येवून तिच्याकडील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लबाडीने काढून घेवून तीची फसवणूक करून पसार झाल्याची घटना तालुक्यातील पालेखुर्द येथे घडली आहे.
वैशाली पाटील (65) या त्यांच्या टपरीवर बसल्या असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरुन तेथे आले. आईच्या नावाने दान धर्म करायचा आहे असे सांगून वैशाली पाटील यांना त्यांच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून ठेवा असे सांगून ते कागदाच्या पेपरमध्ये बांधून ठेवतो असे बोलत त्यांच्या हातात दगड बांधलेली पुडी ठेवून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून ते पसार झाले आहेत. काही वेळा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात केली आहे.