उत्तर परदेशातील गुन्हेगारास दोन बेकायदेशीर पिस्तूलसह पनवेल गुन्हेशाखे कडून अटक
पनवेल / वार्ताहर : -  गुन्हे शाखा कक्ष 2 चे पो. उपनिरी. वैभव रोंगे यांना  बातमी प्राप्त झाली की आज रोजी 16.00 ते 17.00 वाजण्याच्या सुमारास कामोठा ब्रिज खाली दोन इसम अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या प्रमाणे मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ शेखर पाटील,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री प्रवीण पाटील व सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री विनोद चव्हाण यांच्या मगर्दशना खाली कामोठे ब्रिज परिसरात गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वात पो उप नि.रोंगे,पो.ह.अनिल पाटील,कानू,संजय म्हात्रे,संजय पाटील यांनी सापळा लावला असता.साधारण 16.30 वा कामोठे ब्रिज खाली.खालील नमूद मूळ उत्तरप्रदेश येथील दोन गुन्हेगार इसम मिळून आले त्याच्या अंगझडती मध्ये *देशी बनवटीचे दोन पिस्तूल म्यॅगझीन सह,दोन जिवन्त काडतूसे शिवाय एक्सट्रा दोन म्यॅगझीन मिळून आलेल्या आहेत* सदर बाबत कामोठे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात येतआला आहे
अटक आरोपीचे नाव
1. मुकेशकुमार गुलाब सिंग वय.31रा.ठी.ग्राम बसडीला ता.कसया जि.कुशीनगर उ.प्र.
2. नवाब साहब सैफुल्ला अन्सारी वय 22 वर्ष रा ठी.क्र 1प्रमाणे
    अटक आरोपी  नवाब साहेब त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश येथील तुर्कपट्टि पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 342/2021 कलम 307,325,504,506, नोंद असून तो उत्तरप्रदेश येथील सराईत गुन्हेगार आहे.सदर कारवाई बाबत मा.पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे आणी टिम चे अभिनंदन केले आहे.
Comments