१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण...


पनवेल, दि.२६ (वार्ताहर) ः १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असताना सदरची बस नवीन पनवेल ब्रीजच्या सिग्नल जवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबली असता सदर मुलगी बसच्या खाली उतरल्यानंतर तीचे अपहरण केल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदर १६ वर्षीय मुलगी ही वडिलांबरोबर वाशी नवी मुंबई ते पुसद असा ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असताना सदरची बस नवीन पनवेल ब्रीजच्या सिग्नल जवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबली असता सदर मुलगी बसच्या खाली उतरल्यानंतर तीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा अज्ञात इसमाचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Comments