रेमिडीसिव्हीरचा काळा बाजार करणारा लॅब मालक गुन्हे शाखेकडून जेरबंद
पनवेल / वार्ताहर :- सध्या देशात व राज्यभरामध्ये कोव्हीड 19 या आजारामध्ये उपचारासाठी लागणारे रेमिडिसिव्हिर या अत्यावश्यक इंजेक्शन तुटवडा असून, सध्या काही लोक त्याची चढ्या भावात विक्री करुन ब्लॅक मार्केटिंग करीत असल्याने त्यांचेवर कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग ,अप्पर पोलीस आयुक्त सो. गुन्हे डॉ.शेखर पाटील व पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आदेशीत केले होते. गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेलचे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या बातमीनुसार खांदा कॉलनी, ता. पनवेल येथील खानदेश हॉटल समोर एक इसम रीमिडिसिव्हर हे इंजेक्शन 35,000/- रु. या अतिरिक्त भावाने ब्लॅक मार्कंटिंग करण्यासाठी येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सपोनि प्रवीण फडतरे,पो.ह.अनिल पाटील, साळूंखे, रुपेश पाटील, सचीन पवार, सुनील कुदळे, सूर्यवंशी, सचिन म्हात्रे यांनी सापळा लावुन इसम नामे राहुल देवराव कानडे वय 38 वर्षे, धंदा- लॅब टेक्निशियन, रा. कळंबोली, ता. पनवेल यास ताब्यात घेवुन त्याचेकडे *HETRO, Cipla, RemWin या कंपनिच्या प्रत्येकी एक अशा एकुण 03 इंजेकशन मिळुन आले*. 

सदर कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन, रायगड चे सहा. आयुक्त गिरीश हुकरे तसेच औषध निरीक्षक मंजीतसिंग राजपाल याचे सहकार्य घेऊन  खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गु.रजी.क्र. 104/2021 भा.दं.वि. कलम 420 सह औषध किंमत नियंत्रण आदेश 2003 परिच्छेद 26, सह जिवानावश्यक वस्तुंचे अधिनियम 1955 चे वाचन कलम 3 (2) (सी) दंडनिय कलम 7 (1) (ए) (2) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम मधील कलम 18 (ब) चे दंडनिय 27 (बी), 18-ए चे दंडनिय 28. प्रमाणे गुन्हा नोंद करुन नमुद आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखीन काहींना अटक होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल नवी मुंबई करीत आहोत.
Comments