मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडून प्रभाग १८ मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी....
पनवेल :-  मा उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागात नेहमीच वेग-वेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रभातील विकास कामांच्या बरोबर नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजीही तत्परतेने घेत असतात.सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता प्रभागातील सोसायटी/बिल्डिंग तथा बैठी घरे येथे प्रत्येक घराबाहेरील परिसरात कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे.
याआधीही स्वतः मशीन खरेदी करून त्या माध्यमातून 5 वेळा  आणि 3 वेळा महापालिकेच्या माध्यमातून  अश्या प्रकारे कोरोना जंतुनाशक फवारणी मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आपल्या प्रभागात करून घेतली आहे.
प्रभाग १८ मधील सोसायटी/बिल्डिंग  मध्ये जर  काही कारणाने पुन्हा फवारणी करायची असल्यास त्यांनी कृपया माझ्या जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा 9167042666 या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा; तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व अत्यंत गरज असेल तरचं घराबाहेर पडावे असे आव्हान मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केलं.
Comments