सत्यमेव जयते ट्रस्ट तर्फे राज्यात रक्त,ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर, इंजेकशन्स यांचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

पनवेल / वार्ताहर :- अचानक कोरोनाच्या राक्षसाने पुन्हा एकदा आपली मगरमिठीत संपूर्ण महाराष्ट्र अडकल्याचे चित्र आपल्यास दिसून येते आहे. आशात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होते आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक बनला आहे त्यामुळे, कोरोना रुग्णांना लागणारे रेमेडीसेव्हिर इंजेक्शन, रक्त, ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर बेडस, वैद्यकीय उपयोगासाठीचा ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडत आहे, अचानक मागणी वाढल्याने तुटवडा भासत आहे.

सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया तर्फे आरोग्यमंत्री,  राजेशजी टोपे यांच्याकडे या तुटवड्याकडे लक्ष देवून हा गंभीर विषय लवकरात लवकर मार्गी लागावा अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली. 
महाराष्ट्रातील ही विदारक परिस्थिति लवकरात लवकर सुधारेल, काळजी करण्या पेक्षा काळजी घेण महत्वाच ही  सकारात्मक आशा संस्थेच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी व्यक्त केली. आम्ही आमच्या ट्रस्ट कडून जी जमेल ती मदत करण्यास नेहमीच तत्पर आहोत असे सरचिटणीस अभिजीत दिलीप सांगळे यांनी आश्वस्त केले आहे.
Comments