गुन्हे शाखेचे उत्तम तरकसे व रोहित तरकसे यांना वेद फांऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले सन्मानित...
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः नवी मुंबई महाराष्ट्र राज्य पोलीस गुन्हे शाखे मध्ये कार्यरत उत्तम तरकसे आणि रोहित तरकसे यांस त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी मुंबई स्थीत वेद फाऊंडेशन द्वारा सन्मानपत्राद्वारे गौरविण्यात आले. 

वैश्‍विक आपत्ती कोविड मध्ये आपले भरीव योगदान समर्पित करणार्‍या कर्तव्यदक्ष पोलिस दलातील अधिकारी वर्गास संस्थेद्वारे गौरविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत असून उत्तम तरकसे यांच्या सन्मानाने सदर उपक्रमाची सुरवात करण्यात येत असून याचा आम्हाला अभिमान आहे, असं प्रतिपादन संस्था अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी यावेळेस व्यक्त केलं. मुंबई, नवी मुंबई स्थित अनेक पोलीस स्थानकातील अधिकार्‍यांचां सन्मान करत त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उत्तम जनसंपर्क आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित उत्तम तरकसे साहाय करतील अशी आशा संस्थेद्वारे करण्यात आली.

Comments