६० हजार रुपयांच्या मोबाईलची जबरीने चोरी



पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पायी चालत जात असणार्‍या 38 वर्षे इसमाच्या हातातून 60 हजार रुपयांचा मोबाईल जबरीने खेचून नेल्याने खारघर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खारघर, सेक्टर 20 येथील विनोद चाटे हे मोबाईलवर मित्राशी बोलत होते. सेक्टर 27 रांजणपाडा ते गुरुद्वारा रोडवर लकी प्लाझा बिल्डिंग समोर ते पायी चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवर दोन जण आले व त्यांनी चाटे यांचा मोबाईल जबरीने खेचून घेतला, व ते पळून गेले.
Comments