मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला ;मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार....



मुंबई / दि २४ : राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेम्डीसीव्हीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image