शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची ऑनलाइन सभा संवाद सेतू"

पनवेल : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्यची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने दिनांक नुकतीच पार पडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शंभर टक्के मतदान सह प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. कोविड-१९ च्या प्रतिकूल परिस्थितीत देखील निवडणुकी सारखी जटिल प्रक्रिया बिनचूकपणे पार पाडणे हे खरे तर आव्हानच होते. पण हे दिव्य कुठेही गडबड न होता लोकशाही पद्धतीने, निर्विवादपणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. हा खरा तर इतर संघटनांसाठी एक आदर्शच ठरावा.
               
नवनियुक्त राज्य कार्यकारिणीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक सभासदाला पर्यंत पोहोचून संवाद साधण्यासाठी हितगुज करून त्याच्या समस्या विचार जाणून घेण्यासाठी संवाद सेतू या ऑनलाईन व्यासपीठाची संकल्पना मांडली. आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून भौगोलिक अंतर नवीनतम विज्ञानाची कास धरून कमी करण्याचे व संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपल्या सभासदांचा राज्य कार्यकारणी सोबत थेट संवाद घडवण्याचा व 'संवाद सेतू' सर्वप्रथम कार्यान्वित करण्याचा मान रायगड जिल्हा कार्यकारणीला मिळाला. दिनांक १३ मे २०२१ रोजी संवाद सेतूचे आयोजन करण्यात आले होते. सदर संवाद सेतूचा लाभ घेऊन जिल्ह्यातील पन्नासहून अधिक पुनर्नियुक्त माजी सैनिक यांनी राज्याध्यक्ष मा. श्री बाजीराव देशमुख यांचे सोबत थेट संवाद साधला.
                
यावेळी सदर ऑनलाईन व्यासपीठावरून श्री राजीव जामोदकर-उपाध्यक्ष, श्री संतोष मलेवार - सरचिटणीस, श्री दीपक पाटील -चिटणीस, श्री विवेक पांडे - कोषाध्यक्ष यांनी देखील सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. मा.राज्याध्यक्ष श्री बाजीराव देशमुख यांनी या संवाद सेतुमुळे सभासद व राज्य कार्यकारणी यांच्यातील वैचारिक दरी नष्ट होऊन सुसंवाद घडण्यास मदत झाली, तसेच सर्वसामान्य सदस्यांचे मत, विचार जाणून घेतल्याने संघटनेची पुढील वाटचाल निश्चित करण्यास तसेच सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त केले. यासभेसाठी श्री प्रवीण पावसकर विभागीय अध्यक्ष, श्री सोमनिंगा बिराजदार जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे नियोजन श्री सोमनींगा बिराजदार अध्यक्ष, जिल्हा रायगड यांनी तसेच सूत्रसंचालन श्री संतोष तावडे चिटणीस, जिल्हा रायगड यांनी केले
Comments