गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सुनील साळुंखे पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाने सन्मानित...

पनवेल, दि.१ (संजय कदम) ः पोलीस विभागात उत्तम सेवा केल्याबद्दल सन २०२० चे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे खाकी वर्दीतील कडक पोलीस हवालदार म्हणून प्रसिद्ध असलेले सुनील साळुंखे यांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. 
सुनील दत्तात्रय साळुंके पोलीस हवालदार, ब. नं. 404 हे सन 1990 साली नवी मुंबई पोलीस दलात भरती होऊन प्रथम सन 1993 साली पनवेल शहर पोलीस ठाणे, कळंबोली पोलीस ठाणे, पोलिस उपायुक्त पथक, महामार्ग पोलीस, पनवेल तालुका पोलीस ठाणे, गुन्हे शाखा (क्राइम ब्रांच) अशा ठिकाणी कर्तव्य बजावत असताना दरोडा टाकून खून करणारी पारधी टोळी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणारी इराणी टोळी आदी मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच एकाच वेळी चोरी झालेल्या 50 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे शोध लावले आहेत. त्याबाबत केलेल्या चांगल्या कामगिरी साठी त्यांना आतापर्यंत "275" बक्षिसे मिळाली आहेत. त्याबरोबरच कळंबोली येथील सुधागड शाळा येथे बॉम्ब ठेवणारे आरोपी पकडण्यास त्यांनी चांगली मदत केलेली होती. या सर्व कामगिरीची दखल शासनाने घेवून त्यांना पोलीस महासंचालकांच्या महत्वाचे असे पदक जाहीर केले आहे. गुन्हेगारी क्षेत्रात सुनील साळुंखे यांचा चांगलाच दरारा असून त्याचप्रमाणे अनेक विभागात त्यांचे चांगले संबंध असल्याने अनेक वादविवाद त्यांनी जागीच मिटविले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे खबर्‍यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याने पनवेल परिसरासह नवी मुंबई, ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यात एखादी मोठी घटना घडल्यास आर्वजून त्यांना संबंधित पोलीस खात्याच्या अधिकार्‍यांकडून फोन येतो व त्यांची मदत घेतली जाते. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या सोबत काम करणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांचे कौतुक केले आहे.



फोटो ः सुनील साळुंखे
Comments