गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको - सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
खारघर सेक्टर १२ मधील गोखले शाळेला कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे. 
      त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मागील वर्षी गोखले शाळेमध्ये कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले होते. त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला होता. कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक, कैद्यांना येथे आणून सोडून जाणारे पोलीस कर्मचारी, कायदेशीर सल्ला देणारे वकील या सर्वांची होणारी गर्दी व त्यांच्या वाहन पार्किंगमुळे होणारा वाहतूक अडथळा, या सर्व कारणांमुळे येथे नेहमीच छोटेमोठे वाद झालेले आहेत. या सर्वांचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. मागच्या वेळची स्थिती वेगळी असल्याने नागरिकांकडून सहकार्य झाले केले होते, परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे. मागील एक महिन्यापासून कोविड बाधितांची संख्या अतिशय भयावह आहे. त्यात  शाळा ही गर्दीच्या व मध्यवर्ती वसाहतीत स्थित आहे परिसरातील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संसर्गात भर पडण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. या विलगीकरण केंद्रात छोटेमोठे कैदी ठेवले जातात. भविष्यात येथे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या विषयाचा गांभीर्याने विचार करून गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरु करू नये, असे असे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे.  

Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image