शिवसंकल्पच्या रक्तदान संकल्पास उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल :  राज्यात असलेली रक्तसाठ्याची कमतरता आणि त्यासाठी मुख्यमंत्र तसेच वैद्यकीय कोविड योध्यानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज शिवसंकल्प प्रतिष्ठान, पनवेल मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मधील तरुणानी शिवसंकल्प तर्फे केलेल्या या रक्तदानच्या संकल्पाला शहरातील तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटिल व शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटिल यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच स्थानिक आमदार प्रशांत ठाकुर, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकुर, शेकाप जिल्हा चिटणीस व नगरसेवक गणेशजी कडू, महानगरप्रमुख रामदासजी शेवाळे, नगरसेविका रुचिता लोंढे, शिवसेना ग्राहक कक्ष उपजिल्हाप्रमुख शशिकांतजी डोंगरे, शिवसेना तालुका संघटक रामदास पाटिल, शहरप्रमुख सदानंद शिर्के, माजी उपशहरप्रमुख यशवंत भगत, विभागप्रमुख राजेंद्र भगत, भाजपचे नेते संदीप लोंढे, मनसेचे स्थानिक नेते यतिन देशमुख, युवासेनेचे अरविंद कडव, मनोज कुंभारकर, जय कुष्टे, साईसुरज पवार, अक्षय साळुंखे, दुर्गेश शुक्ला, भाजपचे युवानेते केदारजी भगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशिष कारमाळकर, पनवेल शहर कार्यवाह व राजीव बोरा, पनवेल नगर कार्यवाह,शिवसहाय्यचे संकेत बुटाला, अमर पटवर्धन, राकेश टेमघरे इ. व्यक्तीनी भेट देउन शुभेच्छा दिल्या.. 
डोंबिवली ब्लड बॅंकेच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास १०० हुन अधिक रक्तदात्यानी भेट दिली त्यातील ८९ रक्तदात्यानी रक्तदान केले.
अतिशय चांगला प्रतिसाद देत आपल सामाजिक कर्तव्य बजावणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे शिवसंकल्प प्रतिष्ठान, पनवेलच्या सदस्यानी आभार मानण्यात आले.
Comments