गव्हाण गावातील ८५ वर्षाच्या आजोबांची कोरोनावर मात.....


पनवेल :- पनवेल तालुक्यातील गव्हाण या गावातील श्री. गणपत दामोदर देशमुख वय वर्ष ८५ या आजोबांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उलवे सेक्टर १९ येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले..
  १० ते १२ दिवसाच्या डॉक्टर उपचारानंतर आजोबा कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करून आपल्या घरी परतले आहेत.गावातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले..
Comments