पनवेल / वार्ताहर :- तळोजा, सिद्धीकरवले येथे साठ वर्षीय अपंग इसमाला मारहाण केल्याप्रकरणी गोपीनाथ पाटील, प्रभाकर पाटील, शंकर पाटील यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धी करवले येथील वासुदेव गोटीराम पाटील यांना एका डोळ्याने दिसत नाही. आणि ते अपंग आहेत. 28 मे रोजी ते त्यांच्या शेतात म्हशीला चरायला घेऊन गेले होते. त्यांच्या शेताच्या शेजारी गोपिनाथ रामा पाटील यांचे शेत आहे. त्याने त्यांच्या शेतात जेसीबी आणली होती. यावेळी वासुदेव यांनी शेताच्या बांधावर हद्दीची खूण म्हणून वाळलेली झाडाची फांदी लावलेली होती. गोपीनाथ पाटील याने ती फांदी काढून फेकण्यास सांगितली. यावेळी वासुदेव यांनी ती फांदी काढू नको असे सांगितले असता गोपीनाथ पाटील यांनी वासुदेव पाटील यांना शिवीगाळ केली. आणि शेतातील दगड फेकून मारला. त्यानंतर प्रभाकर याने त्यांना खाली ढकलून काठीने मारहाण केली. तर शंकर पाटील याने वासुदेव यांच्या कानाखाली मारली.
तळोजा पोलीस ठाणे गोपीनाथ पाटील, प्रभाकर पाटील, शंकर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.