गावठी दारु हस्तगत


पनवेल, दि.१५ (वार्ताहर) ः तालुक्यातील भंगारपाडा परिसरातून गुन्हे शाखा कक्ष २ व पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने गावठी दारुचा साठा हस्तगत केला आहे.
या ठिकाणी एका घराच्या पाठीमागे हातभट्टीची दारु, कॅन, व इतर साहित्य ठेवण्यात येवून त्याची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल व पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन जवळपास 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments